नाशकात एटीएम फोडून २२ लाख लंपास

नाशकात एटीएम फोडून २२ लाख लंपास

नाशिक – गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून चोरट्यांनी तब्बल २२ लाख ७१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यातील सरदवाडीत घडली आहे. सरदवाडी येथील हॉटेल अजिंक्यताराजवळ शुक्रवारी (दि.१६) मध्यरात्री घडली.

या ठिकाणी असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश केला होता. पुरावा मिळू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडून टाकले. त्यानंतर सोबत असलेल्या गॅस कटर मशीनने एटीएमचे तुकडे केले. शटर बंद करून चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली. रोकड लंपास केल्यानंतरही शटर बंद ठेवले. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत एटीएमचे शटर बंदच होते. मात्र, शुक्रवारी दसरा सणानिमित्त पैसे काढायचे म्हणून अनेक ग्राहक तेथे येऊन गेले. एक ग्राहक बराच वेळ थांबला. त्याने शटर वर केले तेव्हा एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

First Published on: October 16, 2021 7:28 PM
Exit mobile version