थोरात मोठे नेते पण,त्यांना नगर जिल्हयात एकही जागा मिळवता आली नाही : विखे

थोरात मोठे नेते पण,त्यांना नगर जिल्हयात एकही जागा मिळवता आली नाही : विखे

काँग्रेस पक्षातील मूठभर लोकांनी स्वत:च्या फायद्यासाठी पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक नेते स्वत:चे पद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणे देणे राहिले नसल्याचे दिसून येते. नगरचे थोरात स्वत:ला मोठे नेते समजतात, मात्र त्यांना नगर जिल्ह्यासाठी एकही जागा मिळविता आली नाही त्यामुळे मला आता थोरातांची कीव येते, अशा शब्दांत त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरांतावर बोचरी टिका केली.

लोकसभेला महाविकास आघाडीत झालेल्या जागा वाटपावरून विखे पाटील यांनी थोरातांवर टीका करण्याची संधी साधली आहे. संगमनेर तालुक्यात आयोजित एका कार्यक्रमात विखे पाटील यांनी ही टीका केली. विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसवर मोठी नामुष्की आल्याचे दिसते. जेथे पक्षाचे प्राबल्य आहे, तेथील जागा मित्र पक्षांना सोडून दिल्या आणि जेथे पक्षाचे काम नाही, तेथे उमेदवार दिला आहे. नगरचे थोरात स्वत:ला मोठे नेते समजतात, मात्र त्यांना नगर जिल्ह्यासाठी एकही जागा मिळविता आली नाही. उत्तर महाराष्ट्रात ८ जागा असताना तिथेही काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यामुळे थोरातांनी काय काम केले? सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणार्‍या थोरातांनी स्वत:च्या नगर जिल्ह्यात पक्षाचे काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही विखे पाटील यांनी थोरातांना दिला.

First Published on: April 11, 2024 8:49 PM
Exit mobile version