ज्यांनी त्रास दिला, त्याची फरतफेड होईल : सुजय विखे-पाटील

ज्यांनी त्रास दिला, त्याची फरतफेड होईल : सुजय विखे-पाटील

खासदार सुजय विखेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने दिले आदेश

अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत. यापूर्वीच बारा शुन्याचा नारा दिला आहे, आपण जे बोलतो ते पूर्ण होते. जिल्ह्यातील सर्व जागावर युतीचे उमेदवार विजयी होतील, असा आत्मविश्वास खासदार सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेसा प्रदेक्षाध्यक्षांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला त्रास दिला आता त्यांनाही त्रास होईल असा इशाराही त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता दिला.

सुजय विखे-पाटील येथे आले असता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत आपल्याविरुद्ध खालच्या पातळीवर प्रचार केला. कुटुंबातील वाद वाढवण्याचा प्रयत्न केला. त्रास देण्यात आला, ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्याची परतफेड होईल. संगमनेर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना म्हणाले, स्थानिक आमदाराला शिव्या दिल्या म्हणजे उमेदवारी मिळेल, अशा भ्रमात कुणी राहू नये. संबंधितांची मतदारसंघामधील विश्वासार्हता तपासली जाईल.

संगमनेरमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते प्रस्थापितांचा पराभव करु शकतो. या उमेदवारांची आर्थिक परिस्थिती हा निकष नसणार असल्याचे विखे यांनी सांगितले. निळवंडे धरणाच्या कालव्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांनाच आहे. ज्या आमदारांनी कामेच केली नाही ते आता गॅसवर आहे. शिर्डी मतदारसंघात लाखाच्या मताधिक्क्यांने विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात कँग्रेसची पिछेहाट का झाली असे विचारले असता याबाबत तुम्ही कँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाच विचारा असे सांगितले.

First Published on: August 23, 2019 11:59 PM
Exit mobile version