व्यावसायिक सोनवणे खून प्रकरणातील तिघे ताब्यात

व्यावसायिक सोनवणे खून प्रकरणातील तिघे ताब्यात

नाशिकरोड : व्यावसायिक सोनवणे यांचे अपहरण करुन खून करणारे तिघेही संशयितांना पकडण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले असून व्यवसायातून खून झाल्याचे प्रथमदर्शनी समजते. गेल्या वीस दिवसांपासून संपुर्ण पोलीस यंत्रणा तपास करत असलेल्या आव्हानात्मक खूनाचा उलगडा झाल्याने नाशिकरोड पोलिसांचे कौतुक होत आहे.

9 सप्टेंबर 2022 रोजी अपहरण करुन मालेगाव येथील कालव्यात मृतदेह टाकण्यात आला होता, प्रथम ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला असतांनाच नाशिकरोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाची सुत्र शहर पोलिसांच्या हाती आली होती, अपहरण करुन खून करण्यामागील कारण शोधण्यासाठी संपुर्ण पोलीस यंत्रणा काम करत होती, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सिद्धेश्वर धुमाळ, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला होता, दरम्यान मध्यवर्ती, गुन्हे शाखा 1 व 2 यांच्याकडूनही तपास सुरु होता, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून खुनाचा तपास करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते.

10 तारखेला सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात आढळून आल्यानंतर मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे हेमंत पाटील यांनी सदर माहिती नाशिकरोड पोलिसांना कळविल्यानंतर शवविच्छेदनात खून झाल्याचे निष्पन्न झाले होते, 11 सप्टेबर रोजी सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर नाशिकरोड पोलिसांनी सोनवणे यांच्या मोबाईल वरुन दोन हजार रुपयांचा व्यवहार व मोबाईल दुकानातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला होता,

वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, व पोलिसांच्या पथकाने माहिती संकलित केली होती, वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरुन गुरुवारी (दि.29) अंबड परिसरातून एकाला ताब्यात घेतले, कसून विचारपूस केल्यानंतर रात्री दोन पथके मालेगाव व चाळीसगाव येथे रवाना झाले, शुक्रवारी (दि.30) पहाटेच्या सुमारास चाळीसगाव येथून मुख्य आरोपी ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे. प्रवीण काळे याचे अंबड परिसरात फेब्रिकेशन वर्कशाॅप आहे, अपहरणासाठी वापरलेली कार मुंबईला गणपती पाहण्यासाठी जायचे असल्याचे कारण सांगत मेव्हण्या कडून आणली होती, प्रवीण काळे हा मुख्य संशयित असून त्याने सोमनाथ कोंडाळकर व दादू यांच्या सोबतीने कट रचून 1000 बेंच खरेदीची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने अपंग असल्याचे सांगून स्विफ्ट कार मध्ये बसवून अपहरण केले होते.

First Published on: September 30, 2022 8:55 AM
Exit mobile version