सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहतूक पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना पकडले

सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहतूक पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना पकडले

पेट्रोलिंग करत असताना रिक्षातील पाचजण वाहनचालकास कोयत्याचा धाक दाखवत त्याच्याकडी;ा दोन हजार रुपये हिसकावून पळून गेल्याचे नाशिक जिल्हा वाहतूक पोलिसांना समजले. त्यानंतर लगेच पोलिसांनी नाशिक-वाडीवर्‍हे रोडवरील रायगडनगरजवळ पाचजणांचा पाठलाग केला. मात्र, पोलीस आल्याची चाहूल लागताच ते पळू लागले. पोलीस व स्थानिक नागरिकांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत डोंगराकडील परिसरातून पाचजणांना पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.२८) दुपारी केली. विशेस म्हणजे, अटक करण्यात आलेल्या पाच सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक शहरात खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

अक्षय सुभाष ताकवाले (२१, सर्वजण रा. जुने स्टेशनवाडी, देवळाली कँम्प), निखील विजय घहलोत (२६), फईम अश्फाक शेख (३५), रवी लक्ष्मण सावकार (४०), रवींद्र दादू जगताप (३५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

नाशिक जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी बुधवारी (दि.२८) दुपारी नाशिक ते वाडीवर्‍हे रोडवर रायगडनगर जवळ पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना रस्त्याजवळ संशयास्पद अ‍ॅटो रिक्षा दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता रिक्षातील ४ ते ५ जणांनी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत दोन हजार रूपये हिसकावल्याचे आयशर वाहनाच्या चालकाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. पोलीस आल्याची चाहूल लागताच सर्वजण पळू लागले. पोलिसांनी शिताफीने दोघांना पकडले तर तिघांना ग्रामस्थांनी पकडले. याप्रकरणी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सुनील शिंदे, गिरीष निकुंभ व पोलीस नाईक बापूराव पारखे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक सचिन यांनी त्यांचा सत्कार केला.

First Published on: October 29, 2020 4:39 PM
Exit mobile version