पूर्व विभागाचे कार्यालय व्दारका सर्कलजवळ स्थलांतरीत करा

पूर्व विभागाचे कार्यालय व्दारका सर्कलजवळ स्थलांतरीत करा

पूर्व विभागाचे कार्यालय व्दारका सर्कलजवळ स्थलांतरीत करा

मेनरोडवरील पूर्व विभाग इमारतीचा मागचा भाग सोमवारी (ता.२९) कोसळल्यानंतर प्रशासनाच्या एकूणच कामकाजाच्या पध्दतीविषयी टीका टिपण्णी होत आहे. उपमहापौर प्रथमेश गिते यांनी पूर्व विभागाच्या नगरसेवकांसह आयुक्त राधाकृष्ण गिते यांची भेट घेत हे कार्यालय मेनरोडवरुन व्दारका भागात स्थलांतरीत करण्याची महत्वपूर्ण मागणी केली आहे.

भूतपूर्व नगरपालिकेच्या समृद्ध आठवणी जपणारी आणि सध्या महापालिका पूर्व विभागीय कार्यालयाची इमारत म्हणून प्रसिद्ध असलेली मेनरोड येथील शंभर वर्षापूर्वीच्या दगडी इमारतीचा कोपरा सोमवारी (२९जुलै) ढासळला. या कोपर्‍यातील काही दगडे निखळून पडल्याने पाहणार्‍यांच्या काळजाचा ठोका चुकला. दगडी इमारतीत पक्ष्यांच्या विष्ठेतून रोपे उगवली असून ती काढण्याबाबतही महापालिकेने कधी पुढाकार घेतला नाही. वर्षानुवर्षांपासून या इमारतीची दुरवस्था वाढत आहे. चुनखडीदेखील काही ठिकाणाची निघून गेली आहे. जीर्ण झालेल्या इमारतीचे बांधकाम दगडामध्ये चुनखडी वापरून झालेले आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने कधी लक्ष दिलेले नसल्याने त्यातील चुना निघून जाऊन दगड सैल झाल्याने तडा पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. इमारतीचा कोपरा पडेपर्यंत प्रशासन झोपले होते का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Purva buliding

एकीकडे प्रशासनावर टीका होत असताना पूर्व विभागातील नगरसेवकांनी थेट कार्यालयाच्या स्थलांतराचा आग्रह धरला आहे. यासंदर्भात उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने आयुक्तांची भेट घेत कार्यालय व्दारका परिसरात स्थलांतरीत करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मेनरोड परिसर मुख्य बाजारपेठेचा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. अशा वेळी विभागीय कार्यालयात कामकाजानिमित्त येणार्‍या लोकप्रतिनिधी व नागरिकांची ये-जा करण्यास अतिशय गैरसोय होते. त्यामुळे विभागीय कार्यालय हे नाशिक पूर्व विभागाचे मध्यवर्ती ठिकाणी असावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे व्दारका सर्कल येथे भुयारी मार्गाजवळ महापालिकेची सुमारे अडीच एकर जागा आहे. या जागेवर सुसज्ज इमारत उभारल्यास व्यापारी संकुल व विभागीय कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.

ऐतिहासिक वास्तू म्हणून संवर्धन करा-

पूर्व विभागाच्या ऐतिहासिक ब्रिटीशकालीन इमारतीची तातडीने आवश्यक त्याप्रमाणात डागडुजी व दुरुस्ती करुन ऐतिहासिक पुरातन वास्तू म्हणून तिचे जतन व संरक्षण करण्यात यावे, अशीही मागणी प्रथमेश गिते यांनी केली आहे.

First Published on: July 30, 2019 10:23 PM
Exit mobile version