ट्रेकिंग इन्स्टिट्यूट, साहसी क्रीडा संकुल, कन्व्हेक्षण सेंटर हे प्रकल्प लवकरच पूर्ण होणार

ट्रेकिंग इन्स्टिट्यूट, साहसी क्रीडा संकुल, कन्व्हेक्षण सेंटर हे प्रकल्प  लवकरच पूर्ण होणार

वायनाड अॅडव्हेंचर

नाशिक : जिल्ह्यात विकासाचे महत्त्वाचे प्रकल्प आकार घेत असताना या कामांना गती मिळावी. यासाठी आर्थिक नियोजन करण्यात आलेले आहे. या प्रकल्पांचे कामकाज जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट लवकरात लवकर एमटीडीसीने ताब्यात घेऊन सुरू करावा तर गंगापूर येथील साहसी क्रीडा संकुल, कन्व्हेक्शन सेंटरची कामे गतीने पूर्ण करण्याच्यादृष्टीने कामकाज करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी (दि.२६) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रखडलेल्या कामकाजाचा आणि सुरू असलेल्या कामकाजाची माहिती जाणून घेत कामे पूर्णत्वास नेण्यासाठीचे नियोजन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूटचे कामकाज पूर्ण करण्यासाठी शिल्लक निधीतील दीड कोटींच्या कामांचे नियोजन करून उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

एमटीडीसीने अंजनेरी येथील ट्रेकिंग प्रकल्प ताब्यात घेऊन तो लवकरात कामेलवकर सुरू करण्यासाठीचे करार करावेत, असेही सुचविले. गंगापूर येथील साहसी क्रीडा संकुल, कन्व्हेशन सेंटरची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. येथून जवळच असलेले ‘कलाग्राम’च्यारखडलेल्या कामांचा फेरप्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी बांधकाम विभागाला दिले. सय्यदपिंप्री येथे कृषी टर्मिनल मार्केटचा महत्वकांक्षी आणि राज्यातील महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे. मात्र, जागा हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असल्यानेलवकरात लवकर यादंर्भातील प्रस्ताव पाठविण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले. शिवणाई येथे पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र जागेचे भूमिपूजन लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी याकडे त्यांनी अधिकऱ्यांचे लक्ष वेधले.

पंतप्रधान, राष्ट्रपती संभाव्य दौऱ्यासाठी सज्जता

मांगीतुंगी येथे येत्या १५ जूनपासून महोत्सव सुरु होणार असल्याने या सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने या भागात लाईट, पाणी, स्वच्छता, विजेचा पुरवठा, वैद्यकीय पथके या प्राथमिक बाबींचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना भुजबळ यांनी अधिकायांना केल्या आहेत.

चित्रपटनगरीला वेग मिळणार

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे शंभर एकर जागेवर चित्रपटनगरी विकसित करण्यात येत आहे; परंतु येथील कामकाजाला गती देण्यासाठी मुंबईतील एखादी चित्रनगरी किंवा रामोजी फिल्मसिटीसारख्या संस्थांची मदत घेऊन कामकाज पूर्ण करण्याचा विचार असल्याचे भुजबळ यांनी सांगितल्याने नाशिकची चित्रनगरी लवकरच आकारास येण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

First Published on: April 27, 2022 3:43 PM
Exit mobile version