बार असोसिएशन अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; ११ जागांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात

बार असोसिएशन अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; ११ जागांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात

नाशिक : नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२५) अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत ११ जागांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गतवार्षिक निवडणुकीत ९० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यंदा तब्बल ५० उमेदवारांची संख्या कमी झाली आहे. अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार असल्याने या पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. नाशिक बार असोसिएशन निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होताच ४० उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ३ हजार ४६४ सदस्य ११ उमेदवारांना निवडून देणार आहेत. सुरुवातील ६४ इच्छुक उमेदवारांनी विविध पदांसाठी अर्ज भरले होते. दोन दिवस उमेदवारांच्या अर्जांची छाननी केल्यानंतर ११ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. उर्वरित ५३ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. सोमवारी (दि.२५) निवडणुकीसाठी अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे. त्यात १३ उमेदवारांनी माघार घेतल्याचे दिसून आले. पात्र उमेदवारांनी जिल्हाभरातील सदस्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

अ‍ॅड. दिलीप वनारसे यांची माघार
नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत अ‍ॅड. दिलीप शशीकांत वनारसे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. ते अर्ज माघार नाहीत, अशी चर्चा वकिलांच्या वर्तुळात सुरु असताना सोमवारी अ‍ॅड. वनारसे यांनी माघार घेतल्याचे वकिलांना समजले. त्यांनी अर्ज माघार घेतल्याने अनेक वकिलांनी आश्चर्य व्यक्त केले.

पात्र उमेदवारांची अंतिम यादी
अध्यक्ष : अ‍ॅड.महेश आहेर, अ‍ॅड.अलका शेळके, अ‍ॅड.नितीन ठाकरे.
उपाध्यक्ष : अ‍ॅड.बाळासाहेब आडके, अ‍ॅड.प्रकाश आहुजा, अ‍ॅड.वैभव शेटे
सचिव : अ‍ॅड. शरद गायधनी, अ‍ॅड. हेमंत गायकवाड, अ‍ॅड.सुरेश निफाडे, अ‍ॅड.सय्यद उस्मान
सहसचिव : अ‍ॅड.संजय गिते, अ‍ॅड.शरद मोगल, अ‍ॅड.प्रवीण साळवे, अ‍ॅड.चंद्रशेखर शिंदे
सहसचिव : अ‍ॅड.श्यामला दीक्षित, अ‍ॅड.सोनल गायकर, अ‍ॅड.सोनल कदम, अ‍ॅड.स्वप्ना राऊत
खजिनदार : अ‍ॅड.रवींद्र चंद्रमोरे, अ‍ॅड.हर्षल केंगे, अ‍ॅड.कमलेश पाळेकर
सदस्य : अ‍ॅड.किरण बोंबले, अ‍ॅड.अरुण दोंदे, अ‍ॅड.अनिल गायकवाड, अ‍ॅड.संतोष जथे, अ‍ॅड.अरुण खांडबहाले, अ‍ॅड.मिलिंद कुरकुटे, अ‍ॅड.दिलीप पिंगळे, अ‍ॅड.सय्यद रज्जाक, अ‍ॅड.किशोर सांगळे, अ‍ॅड.अनिल शर्मा, अ‍ॅड.शिवाजी शेळके, अ‍ॅड.प्रतिक शिंदे, अ‍ॅड.सोमनाथ उगलमुगले, अ‍ॅड.महेश यादव
सदस्य : अ‍ॅड.अश्विनी गवते, अ‍ॅड.कोमल गुप्ता, अ‍ॅड.मयुरी सोनवणे, अ‍ॅड.वैभव घुमरे, अ‍ॅड.विशाल मटाले

First Published on: April 26, 2022 3:58 PM
Exit mobile version