स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आदिवासी पाडे उजळली

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आदिवासी पाडे उजळली

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे अनेक गावे विकासापासून वंचित राहिली आहेत. त्यातील काही गावांमध्ये वीजजोडणी झाली असली तरीही वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी इंडियन ऑईल कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून या गावांमध्ये सोलर लाईट्स बसविले. परिणामी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गाव, वाड्या, वस्तींमध्ये लखलखाट झाला आहे.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही वीजपुरवठा न पोहोचल्यामुळे नागरिकांना अंधारात आयुष्य जगावे लागत होते. याकरीता खासदार गोडसे यांनी पाहणी करत इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकारयांसमवेत पाहणी करत या गावांमध्ये सौर उर्जेवर चालणारी पथदीपे बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने कंपनीने नुकतेच त्र्यंबक तालुक्यातील वाड्या, पाडे, वस्तीवर सुमारे सव्वाशे सौर पथदीपे कार्यान्वित केली आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये वीजेचा लखलखाट झाला असून गावे प्रकाशमय झाली आहेत. यामध्ये बाफणवीर येथील रानपाडा, बुगतपाडा, पाटाचामाळ, वांगणपाडा. वेळंजेतील दत्त मंदिर, पत्र्याचा मळा, आळीमाळ, बोरीचीखळ, भोगाळा, काशीद वस्ती, जोशीविहीर, चितेकर वस्ती, पलंदी मांजरमाळ, वरसविहीर, हेदुलीपाडा, वाघेरा, कळमुस्ते, हरसूल येथे पथदिप बसविण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सौरदीप बसविण्यात आले आहेत. याशिवाय इतरही काही गावांमध्ये येत्या काळात सौरदीप बसविणार येणार आहेत. यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना व वयोवृद्धांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल.  – हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

First Published on: September 28, 2020 8:09 PM
Exit mobile version