ऊसतोड मजुरांची ट्रक पलटी, २० जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर

ऊसतोड मजुरांची ट्रक पलटी, २० जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर

नांदगाव : न्यायडोंगरी रस्त्यावर ऊसतोड कामगारांना चाळीसगाव येथे घेवून जाणारी ट्रक पलटी झाल्याने ट्रक मधील 18 ते 20 मजुर जखमी झाले. जखमीना ताबडतोब उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता यातील तीन मजुरांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पुणे नारायणगाव येथिल साखर कारखान्यावर ऊसतोड म्हणुन काम करणारे मजुर आपल्या चाळीसगावी परत येत असताना नांदगाव – न्यायडोंगरी नजीक असलेल्या बाभुळवाडी फाट्यावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. आज (दि.8) रात्री साडेदहा वाजता घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीना मिळेला त्या वाहनाने 18 ते 20 मजुरांना  उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती नांदगाव शहरात वार्यासारखी पसरताच शहरातील खासगी डाॅक्टरांनी रूग्णालयात धाव घेत शासकिय डाॅक्टरांसह जखमींवर उपचार केले. यातील तीन गंभीर जखमी मजुरांना ताबडतोब मालेगाव येथे उपचारासाठी रूग्ण वाहिकेतून पाठविण्यात आले. या अपघातामध्ये एकुण 25 मजुर प्रवास करित होते. यात लहान मुले, मुली यांचाही समावेश होता. सदर ट्रकचा वाहन चालक अपघात होताच फरार झाला. त्याचा शोध पोलिस घेत आहे. जखमींवर डाॅ.अमित गायकवाड, डाॅ.काकळीज, डाॅ.परितोष गुप्ता यांसह ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टरांनी उपचार केले.

First Published on: May 9, 2022 12:26 PM
Exit mobile version