शेततळ्यात बुडून सख्ख्या दोन भावांचा मृत्यू

शेततळ्यात बुडून सख्ख्या दोन भावांचा मृत्यू

करपू लागलेल्या पिकांना पाणी देत असताना दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.3) सकाळी मालेगाव तालुक्यातील काटवन शिवारात घडली. ज्ञानेश्वर मुरलीधर सोनवणे (27), किशोर सोनवणे (30) अशी मृतांची नावे आहेत.

सोनवणे कुटुंबियांची मालेगाव तालुक्यातील रामपुरा गावात शेतजमीन आहे. त्यांनी शेतीत मका व उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. ज्ञानेश्वर सोनवणे शिक्षक आहेत. ते किशोरसह सकाळी 11 वाजता शेतजमिनीवर पिकांना पाणी देण्यासाठी आले होते. हवेच्या दाबाने दोघेही शेततळ्यातील पाणी पिकांना देत होते. त्यावेळी पाय घसरून ज्ञानेश्वर सोनवणे 30 फूट खोल असलेल्या शेततळ्यात पडले. त्यास वाचवण्यासाठी किशोर सोनवणे यांनी खांबाला नळीचा वेढा मारून शेततळ्यातील पाण्यात उडी मारली. मात्र, नळीचा वेढा निघाल्याने व दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

First Published on: April 3, 2020 7:48 PM
Exit mobile version