दुभाजकावर दुचाकी आदळून दोन जण ठार

दुभाजकावर दुचाकी आदळून दोन जण ठार

त्र्यंबक रोडवरील बेजे फाट्याजवळ भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना गुरुवारी (ता.११) मध्यरात्री घडली. पेट्रोलिंग करताना पोलिसांना अपघात झाल्याचे दिसताच उपचारासाठी जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वृषाली सोनू चौरे (२४, रा.गोदाई, ता.त्र्यंबकेश्वर), वैभव कैलास सूर्यवंशी (२३, रा.सातपूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

दोघेजण नाशिककडून त्र्यंबकेश्वर रोडने जात होते. दुचाकीचालकाला दुभाजकाचा अंदाज आला नाही. बेज फाट्याजवळ शिव वृंदावन हॉटेलसमोर मध्यरात्री दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. पोलीस पेट्रोलिंग करत असताना अपघात झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी १०८ रूग्णवाहिकेशी संपर्क जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचा आधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.

First Published on: July 12, 2019 8:34 PM
Exit mobile version