एटीएम कार्ड क्लोनिंग करत पैसे काढणार्‍या टोळीतील दोघांना नाशकात अटक

एटीएम कार्ड क्लोनिंग करत पैसे काढणार्‍या टोळीतील दोघांना नाशकात अटक

ATM मशीनमधून असा चोरला जातो 'पिन क्रमांक'

एटीएम कार्ड क्लोनिंग करुन बनावट कार्डव्दारे खात्यावरुन रक्कम गायब करणार्‍या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना पुणे सायबर पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. पुण्यातील सुमारे २५० लोकांचे एटीएम कार्ड क्लोन करुन नाशिकमधील एटीएम सेंटरमधून १ लाख रुपये काढण्यात आल्याचे समोर आले आहे. डोंगरी, मुंबई येथील मोहम्मद अकिल आदिल भोरनिया (वय ३७), मोहम्मद फैजान फारुख छत्रीवाला (वय ३७) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मोहम्मद छत्रीवाला याने त्याच्या साथीदारासह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, गुजरात या ठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकीस आले. तो मागील ३ वर्षांपासून मुंब्रा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार आहे. तो नेपाळमार्गे २ वर्षे दुबईमध्ये पळून गेला. तो डिसेंबर २०१९ मध्ये भारतात परत आला होता. दरम्यान पुणे सायबर पोलीस ठाण्यात अनेक नागरिकांचे बँकेतील पैसे त्यांचे एटीएम कार्ड क्लोन करुन अन्य जिल्ह्यांच्या एटीएम सेंटरवरुन पैसे काढले जात असल्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. त्यानुसार पोलिसांनी वेगाने तपास करत दोघांना अटक केली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोघांच्या ताब्यातून ३५९ बनावट तयार केलेले एटीएम कार्ड, १३ एटीएम स्कीमर डिव्हाईस, १२ डिजिटल मायक्रो कॅमेरा, २ वॉकी टॉकी, चार्जर, हेडफोन, १५ मायक्रो बॅटरी व त्याचे मॅकनिझम, ५० डाटा केबल, ४ लॅपटॉप चार्जर, डाटा केबल, ११ सॉफ्टवेअर मायक्रो सीडीज, ११ स्कीमर लावण्याच्या लहान बॅटरीज, एक मोबाईल, ४ इलेक्ट्रॉनिक सर्किट, ९ सर्किट बॅटरी, एक बनावट एटीएम कार्ड प्रिंट करण्यासाठी लागणार कल प्रिंटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर, पुणे येथील डेनिस मायकल तक्रार दाकल केली. मायकल यांच्या खात्यातून ३० नोव्हेंबर २०२० रोजी नाशिक येथील एटीएम सेंटरवरुन १० ट्रानझाक्शन करुन १ लाख रुपये काढण्यात आले. पुणे सायबर पोलिसांनी तपास सुरु केला. २०० ते २२५ गुन्हे पोलिसांकडे आल्याने तक्रारींचे विश्लेषण करुन आरोपींचा माग काढला असता ते नाशिकमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार पुणे पोलिसांचे पथक नाशिकमध्ये आले. पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले.

First Published on: December 10, 2020 9:40 PM
Exit mobile version