अटक टाळण्यासाठी ३० हजारांची लाच घेणारे दोन पोलीस गजाआड

अटक टाळण्यासाठी ३० हजारांची लाच घेणारे दोन पोलीस गजाआड

पतीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करत अटक टाळण्यासाठी ३० हजार रुपये स्विकारताना दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पोलीस नाईक सुनील ऊर्फ आप्पा हिंमत पाडवी, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप नवनाथ आव्हाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

सुनील पाडवी व प्रदीप आव्हाड यांची आझादनगर पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. तक्रारदाराच्या पतीविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलीस कोठडी वाढवून न घेण्यासाठी व मदत करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी पाडवी व आव्हाड यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करत शहानिशा केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. ८ ऑगस्ट रोजी दोघांनी तक्रारदाराकडून ३० हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बुधवारी (दि.१) आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पथकाने दोघांना अटक केली आहे.

First Published on: September 2, 2021 8:30 PM
Exit mobile version