युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशनची आदिवासी पाड्यावर दिवाळी

युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशनची आदिवासी पाड्यावर दिवाळी

नाशिक : आदिवासी बांधवांनाही दिवाळी साजरी करता यावी याकरिता युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशनतर्फे आदिवासी बांधवांना नवीन कपडे, आकाशकंदिल, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथील हेधपाडा येथे फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

काबाडकष्टातून जीवन जगणार्‍या पाड्यावरील बांधवांनाही दिवाळी आनंदात साजरी करता यावी याकरिता फाउंडेशनतर्फे गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत त्र्यंबकेश्वर येथील हेधपाडा येथे दरवर्षी दिवाळी किटचे वाटप केले जाते. गावातील संपूर्ण कुटुंबाला हे किट देण्यात आले. त्याचबरोबर गावाचे सुशोभिकरण करण्यात आले. दिवाळीचे सौंदर्य फुलून यावं आणि हा दिवस गावकर्‍यांच्या सदैव स्मरणात राहावा म्हणून दिवा आणि आकाशकंदील लावून रंगीत रोषणाई करण्यात आली होती. हा दिवस आम्हाला कायम लक्षात राहील आणि आपण दिलेल्या दिवाळी भेटीने आमचा सण गोड केल्याची भावना गावकर्‍यांनी व्यक्त केली, तर वृद्ध, पुरुष, महिला व लहान मुले असा सर्व वर्गाचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने दिवाळी साजरी केल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष सागर मटाले यांनी व्यक्त केले.

यावेळी मुलांनी इको फ्रेंडली फटाके फोडले. युनाइटेड व्ही स्टॅन्ड संस्थेच्या महिला वर्गाने शेणाने सारवलेल्या परिसरात रांगोळी काढली व सर्व घरांची सजावट करण्यात आली. दिवाळी उपक्रमाप्रसंगी अंकुश चव्हाण, निलेश पवार, हिमांशू सूर्यवंशी, ओम काठे, हरीश सिंग, पियुष कर्णावट, गौरव आव्हाड, गौरव राहाणे, अक्षय गवळी, गिरीश गलांडे, शुभम जाधव, हनी नारायणी, अश्विनी कांबळे, महेक पांडे, माधुरी कळूनघे, श्वेता मुंढे, धनश्री बोरसे, पूजा गोडसे, प्रिती पांढरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: October 30, 2022 7:00 AM
Exit mobile version