आजपासून पालिकेतर्फे ३० ते ४४ वयोगटांना लस

आजपासून पालिकेतर्फे ३० ते ४४ वयोगटांना लस

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाशिक शहरात शनिवार (दि. १९)पासून ३० ते ४४ वर्षे वयोगटाच्या नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे. www.Cowin.gov.in किंवा Aarogya Setu app वर नोंदणी करू शकतात. कोरोना लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असल्यास www.cowin.gov.in किंवा Aarogya Setu app वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन करताना तुमचा मोबाईल नंबर नोंदवायचा आहे. वन टाईम पासवर्डच्या आधारे अकाऊंट क्रिएट करून नाव, वय, लिंग, पत्ता याबद्दलची माहिती भरावी लागेल. लस कधी आणि कुठे घ्यायची याची निवड स्वतःही करता येईल. मोबाईल नंबरवर 4 लोकांची नोंदणी केली जाऊ शकते. तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी ही नावनोंदणी केली जाऊ शकते. नागरिकांनी नावनोंदणी किंवा लसीकरणासाठी जाताना ओळखपत्र, वय दाखला, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रमाणपत्र घेऊन लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

First Published on: June 19, 2021 4:54 PM
Exit mobile version