दररोज २५ हजार नागरिकांचे लसीकरण

दररोज २५ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना लस

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी गेल्या दोन महिन्यापासून लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख १९ हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पुढील काळात लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार असून जिल्ह्यात पुरेश्या लस उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ७० केंद्रावर ही लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी नागरिकांकडून प्रतिसादही वाढू लागला आहे. त्यामुळे पुढील काळात ही केंद्र वाढविण्याबाबतचेही नियोजन करण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ७७ हजार शासकिय कर्मचार्‍यांना लस देण्याबाबतचे उद्दिष्ट होते त्यापैकी ६५ हजार कर्मचार्‍यांनी लस घेतली. तर दुसर्‍या टप्प्यात १७ हजार ६७५ कर्मचार्‍यांनी लस घेतली. त्याचप्रमाणे ६५ हजार ३२० फ्रंट लाईन वर्कर, ४५ ते ५९ वयोगटातील १० हजार २२३ नागरिकांना तर ६० वर्षापुढील ४२ हजार ४४४ नागरिकांना असे एकूण १ लाख १९ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३४ शासकिय आणि २४ खाजगी लसीकरण केंद्र सुरू आहे. परंतु लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी लसीकरण केंद्रातही वाढ करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

First Published on: March 15, 2021 10:33 PM
Exit mobile version