नाशिकची पाणी कपात अखेर मागे

नाशिकची पाणी कपात अखेर मागे

गंगापूर धरणातून विसर्ग कायम

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्के भरल्याने पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज जाहीर केला. अवघ्या दोन आठवड्यांतच पाणी कपातीचा निर्णय मागे घेतला गेल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला.

धरण क्षेत्रासह शहरात १७ जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नव्हता. त्यामुळे गंगापूर धरणातील जलसाठा ४० दिवस पुरेल एवढाच उरला होता. त्यामुळे नाशिक शहरात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने १७ जुलै रोजी घेतला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या दमदार पावसामुळे गंगापूर धरणातील जलसाठा थेट ८० टक्क्यांवर जाऊन पोहोचला.

First Published on: August 2, 2021 3:42 PM
Exit mobile version