नाशिक शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

नाशिक शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

नाशिक : शहरात गुरूवार (दि.२०) रोजी मुख्य पाईपलाईन दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरूवारी सकाळी व सायंकाळी नाशिक शहराला पाणी पुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

महापालिकेच्या गंगापुर धरण पंपिंग पंपिंग स्टेशन येथील मिटरींग क्युबिकल, एचटी व एलटी ट्रान्सफॉर्मर इनकमिंग आऊटगोईंग सप्लाय किट व सबस्टेशन पॅनल रुममधील फिडरचे इनकमिंग आऊटगोईंग सप्लाय किट, वीज वितरण कंपनी बाजुकडील सिक्स पोल स्ट्रक्चरवरील ३३ के.व्ही. इनकमिंग व आऊटगोईंग जंपर बदलले जाणार आहे.

तसेच मुकणे धरण विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातुन जाणारी मुख्य पाईप लाईन दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामासाठी गुरूवार (दि.२०) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आठ तासांचा शटडाउन करण्यात येणार आहे. संपुर्ण शहराचा गुरुवार (दि.२०) रोजीचा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच (दि.२१) रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

First Published on: January 18, 2022 8:35 AM
Exit mobile version