पोलीस चौकीतच पोलिसांची दारूची पार्टी; चार पोलीस निलंबित

पोलीस चौकीतच पोलिसांची दारूची पार्टी; चार पोलीस निलंबित

पोलीस चौकीतच मंगळवारी (दि.१५) रात्री १० वाजेदरम्यान दारुची पार्टी करणार्‍या चार पोलिसांना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आज निलंबित केले. मद्यपी पोलिसांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. रघुनाथ ठाकूर, सागर बोधले, सूरज जाधव, मयूर सिंग अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

दारू पिऊन धिंगाणा घालणार्‍याची तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारांना पोलीस चौकीतच पाच पोलीस दारूची पार्टी करत असल्याचे दिसून आले. ही घटना गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगरमधील पोलीस चौकीत मंगळवारी (दि.१५) रात्री 11 वाजता घडली. विशेष म्हणजे, पोलिसांनी तक्रारदारांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला होता. बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मद्यपी पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली.

First Published on: March 16, 2022 10:37 AM
Exit mobile version