परतीच्या पावसाचा चौफेर धुमाकूळ; दिंडोरी तालुक्यात वृद्धा ठार

परतीच्या पावसाचा चौफेर धुमाकूळ; दिंडोरी तालुक्यात वृद्धा ठार

दिंडोरी तालुक्यात अनेक रस्त्यांना असे नाल्यांच स्वरुप आले होते.

दोन दिवसांच्या अंतराने आलेल्या परतीच्या पावसाने शहरासह ग्रामीण भागात दमदार बरसत चांगलाच तडाखा दिला. दिंडोरी तालुक्यात वीज पडून एक यमुनाबाई गांगुर्डे ही ६५ वर्षाची महिला ठार झाली. तर, ननाशी येथे सुनीता भोये (वय २९) ही महिला जखमी झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळले, तर बहुतांश सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. दिंडोरी, सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्याला पावसाने झोडपले.

दिंडोरी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, सायंकाळी पावसाने चार वाजेपासून दमदार बॅटिंग केल्याने वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडासह दमदार हजेरी लावल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.  परतीच्या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान केले.

First Published on: October 5, 2019 7:40 PM
Exit mobile version