संततधार सुरूच, गोदाकाठच्या रहिवाशांचा जीव टांगणीला

संततधार सुरूच, गोदाकाठच्या रहिवाशांचा जीव टांगणीला

शहरासह जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी रात्री काहीशी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी सकाळपासून पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे उपनद्यांमधून वाहणाऱ्या पाण्याने गोदावरीच्या पातळीत वाढ होईल, या भीतीने गोदाकाठच्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

शनिवारी, ७ जुलैला दुपारपासून पावसाने जोर पकडला आहे. रविवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम असल्याने, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्यांचे स्वरुप आले होते. या पावसाने धरणांच्या पातळीतही भर पडायला सुरुवात झाली आहे. गंगापूर धरणात गेल्या २४ तासांत ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे गोदावरीच्या पातळीतही वाढ झाली आहे. अन्य धरणांच्या परिसरातही पावसाला सुरुवात झाली आहे.

बघा गोदावरीचे रुप…

First Published on: July 7, 2019 10:45 AM
Exit mobile version