बांगड्या भरणार्‍याचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी

बांगड्या भरणार्‍याचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी

उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झालेला जनार्दन कासार.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील जनार्दन कासार याने घवघवीत यश मिळवले आहे. त्याने राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. त्याची उपजिल्हाधिकारी म्हणून त्याची निवड झाली आहे.

जनार्दन कासार सारोळे खुर्द येथील बांगड्या भरण्याचा व्यवसाय करणारे अंबादास कासार यांचा मुलगा आहे. वडिलांची परिस्थिती अत्यंत गरीबीची, लग्नकार्यात बांगड्या भरण्याचा व्यवसाय करून झाल्यानंतर परिसरातील विहिरीचे काम किंवा शेतीवर मजुरी करून त्यांनी मुलांना शिकवले. जनार्दनचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद सारोळे खुर्द येथे, माध्यमिक शिक्षण वनसगाव येथील रयत शिक्षण संस्थेत, उच्च माध्यमिक शिक्षण लासलगाव महाविद्यालयात पूर्ण केले. जनार्दन १२ वीच्या परीक्षेत लासलगाव प्रथम येऊन ८१ टक्के गुण मिळवले होते. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून डी एड चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन कला शाखेची पदवी मिळवली. त्यानंतर नाशिक येथे पार्टटाईम नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पोस्टल असिस्टंट या पदावर रायगड येथे चार वर्षे नोकरी करतानाच स्पर्धा परीक्ष देणे सुरूच होते. २०१७ मध्ये राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर प्रथमच नायब तहसीलदार पदावर निवड झाली. या पदावर रुजू न होण्याचा धाडसी निर्णय घेऊन त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा राज्यसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात महाराष्ट्र राज्यात उपजिल्हाधिकारी म्हणून ६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

सर्वांचाच मोलाचा वाटा

माझ्या यशामध्ये माझे आई वडील, पत्नी व भाऊ तसेच मनोहर गोळेसर, विक्रीकर विभागाचे कमिशनर माने, रजपूत, उपायुक्त खानंदी, दीपक कापडे व सागर पवार यांचा मोलाचा वाटा आहे. – जनार्दन कासार

First Published on: March 11, 2019 1:55 PM
Exit mobile version