पांडवलेणी डोंगरावर झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

पांडवलेणी डोंगरावर झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

पांडवलेणी डोंगरावर झाडाला गळफास घेत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. विलास दाजीबा सुतारे (वय ३०, मूळ रा. कोथरुड, जि. हिंगोली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवार सुटीनिमित्त सकाळी पांडवलेणी डोंगरावर भटकंती आलेल्या पर्यटकांना एका तरुणाने झाडाला गळफास घेतल्याचे दिसले. पर्यटकांनी तात्काळ इंदिरानगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी शीघ्र कृती दल आणि बचाव दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह खाली आणला. मृत तरुणाचे नाव विलास दाजीबा सुतारे असून तो मूळचा कोथरूड, जि.हिंगोली येथील आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

First Published on: March 27, 2022 6:46 PM
Exit mobile version