जि.प. : बदलीस पात्रसह ४६२१ शिक्षकांची यादी प्रसिध्द

जि.प. : बदलीस पात्रसह ४६२१ शिक्षकांची यादी प्रसिध्द

नाशिक : जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत मंगळवारी (दि.29) संवर्ग एक ते संवर्ग चार पर्यंतच्या 4 हजार 621 शिक्षकांची यादी ऑनलाईन प्रसिध्द झाली आहे. या यादीवर हरकत घेण्यासाठी शिक्षकांना 3 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

एकाच शाळेत पाच वर्षे किंवा सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांमध्ये 10 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. टप्पा-१ अंतर्गत दोन हजार 140 शिक्षकांनी अर्ज केला आहे. त्यातील 513 शिक्षकांनी बदली करण्यास होकार कळवला आहे. उर्वरित 1636 शिक्षकांनी बदली करण्यास नकार कळवला आहे. टप्पा-२ अंतर्गत 213 शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. टप्पा-२ अंतर्गत पती-पत्नी एकत्रिकरण केले जाते. त्यामुळे बदली अर्जासोबत शिक्षकांना पती व पत्नी या दोघांच्या शाळेतील अंतर 30 किलो मिटरपेक्षा जास्त आहे किंवा नाही, याचा दाखला जोडावा लागतो. हा दाखला कार्यकारी अभियंत्यांकडून मिळवल्यानंतर सोमवारी शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

या पडताळणीनंतर संवर्ग एकमधील 9 शिक्षक अपात्र ठरले. तर संवर्ग दोनमधील चार शिक्षक अपात्र ठरले. संवर्ग-१ व संवर्ग-२ यांच्यासह संवर्ग-३ अर्थात बदली अधिकार प्राप्त ठरणार्‍या 1291 शिक्षकांची आणि संवर्ग-४ अंतर्गत बदलीस पात्र ठरणारे 982 शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रसिध्द केली आहे. या यादीवर शिक्षकांना चार दिवसांत हरकती घेता येतील.

First Published on: November 30, 2022 11:10 AM
Exit mobile version