जिल्हा परिषद ई-निविदा कक्ष कागदावरच

जिल्हा परिषद ई-निविदा कक्ष कागदावरच

प्रातिनिधिक फोटो

राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद स्तरावर सर्व विभागाच्या ई-निविदा प्रसिध्द करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापण्याचा संकल्प वर्षभरानंतरही कागदावरच राहीला आहे.

जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या तीन लाखांवरील कामांची ई- निविदा प्रसिध्द करुन त्यासाठी ठेकेदारांकडून प्रस्ताव मागविले जातात. प्रत्येक विभाग आपल्या स्तरावर निविदा प्रसिध्द करण्याचे काम सांभाळत असल्याने त्यास अनावश्यक विलंब होतो. या कारणास्तव दोन लिपिकांवर कठोर कारवायी देखील करण्यात आली होती. कामात होणारी दिरंगाई टाळुन सुसूत्रता आणण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी स्वतंत्र ई-निविदा कक्ष तयार करण्याची घोषणा करत, १ जानेवारी २०१८ ला या कक्ष कार्यन्वीत करण्याचा संकल्प केला होता. मात्र, घोषणेनंतर कक्षाबाबत कारवाई झाली नव्हती. डॉ. नरेश गिते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर याकामी, पुढाकार घेऊन ई निविदा नियंत्रण कक्षाची स्थापना केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे अध्यक्ष असून कार्यकारी अभियंता (बांधकाम) हे सदस्य सचिव व सर्व विभागांचे प्रमुख हे सदस्यांची समिती नियुक्त करत, कक्षासाठी स्वतंत्र ६ कर्मचार्‍यांची नियुक्ती केली गेली. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने समिती गठीत करून पुढील कार्यवाहीसाठी फाईल सचिवांकडे सादर केली. मात्र, या फाईलवर अद्यापही कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे संकल्प केलेला हा कक्ष प्रत्यक्षात स्थापन होऊ शकलेला नाही.

असा होणार फायदा

ई-निविदा कक्षाच्यावतीने विविध विभागनिहाय प्राप्त निविदांची नोंद ई- निविदा आवक नोंदवहीत करणे, निविदा अपलोड करणे, निविदा उघडणे आदि सर्व प्रकारची काम करावयाची आहेत. या कक्षाच्या स्थापनेमुळे ई-निविदा कामाबाबत तांत्रिक अडचणी दूर होतील.

First Published on: January 27, 2019 9:05 PM
Exit mobile version