प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी जाणार संपावर

प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी जाणार संपावर

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या राज्य शासनाने त्वरीत मार्गी लावाव्यात यासाठी जिल्हा परिषद सर्व संवर्गिय संघटनेतर्फे येत्या जुलै महिन्यात एक दिवस घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 9 ऑगस्ट रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषद संघटनेची राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक संघटनेचे अध्यक्ष बलराज मगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नाशिक येथून संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार हळदे, पेन्शन संघटनेचे दिलीप वारे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश थेटे, अजय कस्तुरे, प्रशांत कवडे, श्रीरंग दिक्षित, अनिल गिते, संदीप दराडे, शालीग्राम उदावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेच्या या पदाधिकार्‍यांनी विविध विषय मांडले. यात कर्मचार्‍यांचे वेतन व पेन्शन वेळेवर होणे,७ व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा करणे,विनंती बदलीची ३ वर्षाची अट शिथिल करुन ती १ वर्ष करणे, ग्रेड पे मधे सुधारणा करणे,वर्ग ४ मधून कनिष्ठ सहाय्यक ५०: ४०:१० नुसार भरणे, परीक्षा सुट बाबत पूर्ववत वयोमर्यादा ४५ ची ठेवणे, आगाऊ वेतनवाढ पुन्हा पूर्ववत सुरु करणे आदी विषय मांडले.

First Published on: June 23, 2021 6:01 PM
Exit mobile version