झेडपी आढावा बैठक ‘अफ्टर इफेक्ट’; सीईओनी घेतली विभागप्रमुखांची झाडाझडती

झेडपी आढावा बैठक ‘अफ्टर इफेक्ट’; सीईओनी घेतली विभागप्रमुखांची झाडाझडती

नाशिक : जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीचे पडसाद सोमवारी (दि.14) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विभाग प्रमुखांच्या झाडाझडती घेत त्यांच्या कामकाजावर खुली नाराजी व्यक्त केली. कामकाजात झालेल्या चुका सुधारण्यात याव्यात तसेच 2022-23 या आर्थिक वर्षातील नियोजन करून तात्काळ सादर करण्याच्या सूचना मित्तल यांनी विभागप्रमुखांना दिल्या.

मालेगाव तालुका अनेक योजनेत पिछाडीवर दिसून आल्याने मालेगावचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कार्यवाहीची नामुष्की आली. तसेच कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्याविरोधात आमदारांच्या तक्रारी वाढलेल्या असतांना बैठकीस दांडी मारल्यामुळे त्यांची चौकशी करून अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश भुसे यांनी प्रशासनाला दिले. सोमवारी मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी निमयमित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केलेली खुली नाराजीवर मित्तल यांनी विभागप्रमुखांना विचारणा केली. आपल्याच विभागाची माहिती आपणास ठेवता येत नाही? बैठकीची तयारी केली नव्हती? चांगले केलेले काम असताना देखील सादरीकरण करता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. नियोजनातील ढिसाळपणावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित करत, अधिकार्‍यांना सुनाविल्याचे कळते. बैठकीमध्ये यापुढे असे होता कामा नये, कामात सुधारणा करा, चांगले काम करा अशा सूचना त्यांनी विभागप्रमुखांना दिल्या. सन 2022-23 आर्थिक वर्षातील निधी नियोजनाच्या आढावा घेत प्रत्येक विभागाने निधीचे नियोजन करावे. वेळात नियोजन करून ते सादर करण्याचे आदेश दिले.

First Published on: November 15, 2022 12:10 PM
Exit mobile version