झेडपीची नवीन इमारत 12 कोटींनी वाढली

झेडपीची नवीन इमारत 12 कोटींनी वाढली

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या डिझाईनमध्ये फेरबदल झाल्याने इमारतीच्या मूळ किमतीमध्ये १२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मूळ २५ कोटी ३० लाख रुपयांची इमारत आता  ३७ कोटी रुपयांवर पोहोचली  आहे. वाढीव रक्कम देताना जिल्हा परिषदेच्या बांधकाव वित्त विभागाने काथ्याकूट करत अखेर खर्चास मंजूरी दिली आहे.  त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कल जवळील पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर जिल्हा परिषदेची इमारत उभी राहत आहे. अभिजित बनकर यांच्या क्रांती कन्स्ट्रक्शनला हे काम मिळाले असून, आजपर्यंत ग्राऊड फ्लोअरपर्यंतचे काम पूर्ण झाले  आहे.

पुढील बांधकामासाठी आर्थिक तरतूद व्हावी म्हणून ठेकेदार बनकर यांनी जिल्हा परिषदेकडे १० टक्के वाढीव रकमेसह फाईल पाठवली. मात्र, वित्त विभागाने ही फाईल अमान्य केली होती. वाढीव रकमेस राज्य शासनाची मान्यता घ्यावी किंवा जिल्हा परिषदेने २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वसाधारण सभेत केलेला ठराव द्यावा, अशी भूमिका घेतली आहे.

तर कार्यकारी अभियंता व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वाढीव रक्कमेला परवानगीची गरज नसल्याचे सांगितले. या दोन्ही विभागांच्या भांडणात जिल्हा परिषदेची नवीन इमारतीचे बांधकाम रखडले आहे. इमारतीच्या प्रकलनात बदल होत असल्याने बांधकाम खर्चात वाढ झाल्याचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांनी सांगितले. संपूर्ण इमारतीमध्ये एक मजला अधिक होणार असल्याने एकूण १५०० स्वेअर मिटरचे बांधकाम वाढत असल्याने १२ कोटी रुपये खर्च वाढल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वाढीव रकमेस मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु असून, राज्य शासनाला याविषयी कळवण्यात येणार आहे.

अशी असेल नवीन इमारत

First Published on: April 5, 2022 8:10 AM
Exit mobile version