नवनीत राणा : ‘मॉडेल, अभिनेत्री ते खासदार’

नवनीत राणा : ‘मॉडेल, अभिनेत्री ते खासदार’

महाराष्ट्राच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार नवनीत राणा सध्या चर्चेत आहेत. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी राज्यातील शिवसेना सरकारशी थेट संघर्ष केला आहे.शनिवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान दिले. पण, नंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि सांगितले की रविवारी पंतप्रधान मोदींची मुंबई भेट लक्षात घेऊन त्यांनी आपली पावलं मागे घेतली आहेत.गेल्या दोन दिवसांपासून ‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांची गर्दी आहे. खासदार नवनीत राणा यांनी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचल्याच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहेत.

राज्याच्या राजकारणात अचानक वर्चस्व गाजवणारे नवनीत राणा आज चर्चेत असतील, पण एक काळ असा होता की त्यांना राजकारणाबद्दल फारशी माहिती नव्हती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नवनीत राणा एकेकाळी दाक्षिणात्य चित्रपटातीव प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.नवनीत राणा यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला.नवनीत यांचे आई-वडील मूळचे पंजाबचे आहेत.त्यांची आई गृहिणी होत्या, तर वडील लष्करात अधिकारी होते.नवनीत कौर यांनी १२वी नंतर आपले शिक्षण सोडून चित्रपटांमध्ये दिसल्या आणि मॉडेलिंगला सुरुवात केली.मॉडेलिंगच्या सुरुवातीला त्यांनी ६ म्युझिक अल्बममध्ये काम केले.यानंतर त्यांनी ‘दर्शन’ नावाच्या कन्नड चित्रपटातून आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअरला सुरुवात केली.नवनीत कौर यांनी ‘सीनू’, ‘वासंती’ आणि ‘लक्ष्मी’ या तेलगू चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाची छाप सोडली. ‘चेतना’, ‘जगपथी’, ‘गुड बॉय’ आणि ‘भूमा’ या चित्रपटांमध्ये त्यांना अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.त्यानंतर त्या ‘हम्मा-हम्मा’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होता.

‘लव्ह इन सिंगापूर’ या मल्याळम चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी पंजाबी चित्रपट ‘लड गये पेंच’मध्येही काम केले होते.२०११ हे वर्ष नवनीत यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.नवनीत राणा या बाबा रामदेव यांच्या शिष्या आहेत.योग शिबिरात जात असताना त्यांची भेट राजकारणी रवी राणा यांच्याशी झाली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथेच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली.यानंतर २०११ मध्ये सामूहिक विवाह कार्यक्रमात रवी राणासोबत लग्न केले.या सोहळ्यात ३ हजार २०० जोडप्यांचे एकत्र लग्न लावण्यात आले होते.त्यांचे लग्नदेखील चर्चेचा विषय ठरला होता, कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सामूहिक विवाह कार्यक्रमात लग्न करण्याची ही पहिलीच वेळ होती. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाबा रामदेव आणि सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो राय यांसारख्या सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती.

रवी राणासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे राजकारणात प्रवेश केला.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली.त्यावेळी त्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात पराभूत झाल्या होत्या.याच निवडणुकीपासून त्यांचे शिवसेनेसोबतचे वैर सुरू झाले.यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आणि विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.अडसूळ यांचा पराभव करून त्या लोकसभेत पोहोचल्या आणि लगेच त्यांनी भाजप सरकारला समर्थन दिले,हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसाठी मोठा धक्का होता.

First Published on: April 24, 2022 12:53 PM
Exit mobile version