पूर परिस्थितीत अडकलेल्यांचे पुनर्वसन करण्यात येणार, नवाब मलिक यांची माहिती

पूर परिस्थितीत अडकलेल्यांचे पुनर्वसन करण्यात येणार, नवाब मलिक यांची माहिती

गोसावीच्या बॉडीगार्डने NCB विरोधात केलेल्या आरोपाची SIT चौकशी करा, मलिकांची मागणी

राज्यात मुसळधार पावसामुळे कोकणात, कोल्हापूर, सांगलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, सातारा भागात दरड कोसळल्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पूर परिस्थितीमध्ये अडलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्याती नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे यामुळे आधी नागरिकांना वाचवण्यात येणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनीही पूरग्रस्त भागाचा दौरा केला पाहिजे असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मलिक यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक परिस्थिती भीषण झाली आहे. रायगड, पोलादपूर, चिपळूनमध्ये गाव पाण्याखाली गेली आहेत. चिपळूनमध्ये आतापर्यंत ५०० लोकांची सूटका करण्यात आली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु ठेवण्यात आले आहे. कोयना आणि अलमाटी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे कोल्हापूरमध्येही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

चिपळूण, रत्नागिरीत पाणी ओसरत आल्यावर तेथील स्थानिकांना योग्य मदत करण्यात येईल परंतु त्यापुर्वी या नागरिकांचे स्थलांतरण करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांच्या खाण्याची आणि राहण्याची सोय करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही पूर परिस्थितीमधील नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असेही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री संपर्कात

राज्याचे जलसंपदा मंत्री पुराच्या पार्श्वभूमीवर नियोजन करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील पूर परिस्थितीचा वारंवार आढावा घेत आहेत. अधिकारी आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. लोकांचा जीव वाचवणं आमची प्राथमिक जबाबदारी असल्यामुळे सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

First Published on: July 23, 2021 6:42 PM
Exit mobile version