शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल- नवाब मलिक

शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल- नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा मंगळवारी रात्री उशीरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पित्ताशयावर दुसऱी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना घरीच विश्रांती करण्यासाठी सोडण्यात आले होते. पुन्हा शस्त्रस्क्रियेनंतरच्या उपचारासाठी शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयामध्ये खडे झाले होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्याच्या पित्ताशयातील खडे शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले होते नंतर १० दिवसांच्या अंतराने पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार शस्त्रक्रियेनंतर पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले. पित्ताशयावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पुढील उपचारासाठी शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. अशा आशयाचे ट्विट अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

पित्ताशयात खडा झाल्याने केली होती शस्त्रक्रिया

मार्च महिन्यात पोटात वेदना होत असल्यामुळे शरद पवार उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयात उपचार करताना पित्ताशयामध्ये खडा झाल्यामुळे वेदना होत असल्याचे अहवालांद्वारे निदर्शनास आले होते. यानंतर शरद पवार यांच्यावर ३० मार्चरोजी पित्ताशयाच्या खड्यावर शस्त्रक्रिया करत खडा काढण्यात आला होता. यानंतर १२ दिवसांच्या विश्रांती नंतर १२ एप्रिलला शरद पवार यांच्या पित्ताशयावर दुसरी शस्त्रक्रिया करत पित्ताशय काढण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा शस्त्रक्रियानंतरच्या उपचारासाठी शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधाराणा होत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत नवाब मलिक वारंवार राज्यातील जनतेला माहिती देत असतात.

First Published on: April 21, 2021 10:28 PM
Exit mobile version