राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Nawab Malik informed 7 thousand 713 unemployed get Job in January

राज्यात कोरोनाच्या केसेसमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होतेय. त्यामुळे राज्यात तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, बुधवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये कोरोनाचा आढावा घेत असताना कोरोनाची माहिती देण्यात आली. ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच जगात एक नवीन डेलमायक्रॉन नावाचा विषाणू आला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काही निर्बंध लावायचे असतील तर ते आज काम होईल. तिसरी लाट जानेवारी ते मेपर्यंत येऊ शकते, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.
बंगालची, तामिळनाडूची निवडणूक झाल्यानंतर देशात दुसरी लाट आली होती. त्यामुळे हायकोर्टाने तिसरी लाट येऊ शकते म्हणून दोन – तीन महिने निवडणुका पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे.निवडणुका पुढे ढकलण्याच्या नावाखाली ज्या पाच राज्यांत निवडणुका आहेत तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करून पंजाबमध्ये सत्ता ताब्यात घेणे त्यांना शक्य होऊ शकते. निवडणुका पुढे ढकलणे हे वेगळे संकट देशात निर्माण होऊ शकते. त्यामुळे काही निर्बंध घालून मर्यादित ‘डोअर टू डोअर’ प्रचार कोरोना नियम पाळून निवडणुका होऊ शकतात. यावर केंद्र सरकारने विचार करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

First Published on: December 25, 2021 4:30 AM
Exit mobile version