Cruise Drug Bust : फ्लेचर पटेलचे भाजपशी कनेक्शन काय ? नवाब मलिकांचा सवाल

Cruise Drug Bust : फ्लेचर पटेलचे भाजपशी कनेक्शन काय ?  नवाब मलिकांचा सवाल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आज पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कारभाराचा पर्दाफाश करणार आहेत. मात्र आज पत्रकार परिषद न घेता, केवळ ट्विटच्या माध्यमातून ते ही पोलखोल करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे स्पष्ट केले आहे. नवाब मलिक यांनी याआधीच पत्रकार परिषद घेत वारंवार एनसीबीच्या कारभारावर टीका केली आहे. आजही ते एनसीबीकडून होणाऱ्या चुकीच्या गोष्टींचा उलगडा करणार असल्याचे कळते.

 

नवाब मलिक यांनी ट्विट करताना फ्लेचर पटेल कोण आहे ? असा सवाल केला आहे. या फ्लेचर पटेलचे भाजपचे काय कनेक्शन असाही सवाल नवाब मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

शहीद कारगिल दिवसाच्या निमित्ताने फ्लेचर पटेल आणि एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांचा एकत्र फोटो नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर ट्विट केला आहे. सैनिक फेडरेशनच्या कार्यक्रमातही ते दोघे एकत्र दिसले होते.

फ्लेचर पटेल एका फोटोत My Lady Don सोबत दिसत आहे. ही लेडी डॉन कोण आहे ? असाही सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. त्याआधीच्या ट्विटरमध्ये नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेलचे भाजपचे कनेक्शन काय असा सवाल केला आहे.

फ्लेचर पटेल हे समीर वानखेडेंचे फॅमिली फ्रेंड आहेत. हे फॅमिली फ्रेंड एखाद्या छापेमारीच्या प्रकरणात कसे काय पंच होऊ शकतात ? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. २ ऑक्टोबरपर्यंत पंचांना ओळखत नाही हे समीर वानखेडे कसे सांगतात. हे तीन व्यक्ती कसे पंच झाले हे एनसीबीने सांगणे गरजेचे आहे. ही लेडी डॉन कोण आहे ? फ्लेचर पटेल कुठे कुठे जात आहेत ? फिल्म इंडस्ट्रीत काय दहशत निर्माण करत आहेत ? इंडस्ट्रीत पैसे उकळण्याचे काम करत आहेत का ? फ्लेचर पटेलसोबत दिसणारी लेडी डॉन कोण आहे ? फ्लेचर पटेल इंडिपेंडेंट आहे का ? तुम्ही लोकांना फसवत आहात. या दोघांच्या माध्यमातून काय कारवाया सुरू आहेत. लेडी डॉन कोण आहेत ? ही फिल्म इंडस्ट्रीत काय काम करत आहे ? एखादा फॅमिली फ्रेंड कसा काय पंच असू शकतो ? असाही सवाल नवाब मलिक यांनी केला. एनसीबी पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करावा. एनसीबीसोबत दिसणारे फ्लेचर पटेल हे राजकीय पक्षाच्या चित्रपट संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे समीर वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करत आहेत का ? असाही सवाल नवाब मलिक यांनी केला.

याआधीच नवाब मलिक यांनी त्यांच्या जावयाचा बचाव करताना स्पष्ट केले होते की, एनसीबीने फक्त प्रसिद्धीसाठी आपल्या जावयाला अडकवले आहे. याआधीच्या पत्रकार परिषदेत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना हर्बल चहा आणि गांजा यातील फरक ओळखता आला नाही. माझ्या जावयाला एनसीबीने मुद्दाम अडकवले असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रकार परिषदेत केला होता. तसेच किरण गोसावी आणि मनिष भानुशाली यांचे भाजप कनेक्शनही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेद्वारे उघड केले होते. तसेच भाजपशी संबंधित असलेले मोहित कंबोज (भारतीय) यांचा मेव्हणा या क्रुझवर होता. त्यालाही भाजपच्या नेत्यांच्या दबावामुळे एनसीबीने सोडून दिले हा गौप्यस्फोटही नवाब मलिक यांनी केला होता.

या संपुर्ण प्रकरणात मोहित कंबोज यांनीही नवाब मलिकांवर मानहानीचा दावा केला आहे. तसेच सरकारी साक्षीदार असलेले किरण गोसावी यांनाही पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस पाठविण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या आरोपानंतर एनसीबीनेही या आरोपांचे खंडण करत संपुर्ण प्रकरणात पारदर्शी पद्धतीने कारवाई सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच राजकीय आरोपांवर बोलण्यासाठी एनसीबीने नकार दिला आहे.

एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी संपुर्ण प्रकरणात काम करताना आपल्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांना आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांनाही त्यांनी पत्र दिले आहे. या पत्राची दखल घेत मुंबई पोलिसांनीही सदर प्रकरणी कारवाई सुरू केसली आहे.


 

First Published on: October 16, 2021 10:23 AM
Exit mobile version