बेनामी पत्रातल्या आरोपांची चौकशी करा; नवाब मलिकांचं एनसीबीच्या महासंचालकांना पत्र

बेनामी पत्रातल्या आरोपांची चौकशी करा; नवाब मलिकांचं एनसीबीच्या महासंचालकांना पत्र

बेनामी पत्रातील आरोपांची चौकशी करा, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीकडे केली आहे. मलिक यांनी एनसीबीच्या महासंचालकांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. नवाब मलिक यांनी आज आज ट्वीटरच्या माध्यमातून एनसीबीच्या अधिकार्‍याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिलेले एक पत्र शेअर करुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. यात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

नवाब मलिक यांनी मंगळवारी एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याकडून मिळालेलं पत्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे. या चार पानांच्या पत्रात समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. या पत्रात २६ वेगवेगळ्या प्रकरणांची माहिती आहे. ज्या प्रकरणांमध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आलं आहे अथवा फसवण्यात आलं आहे याबाबतची माहिती त्या आधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच, सीबीआचे माजी विशेष संचालक आणि आताचे दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, नवाब मलिक यांना ज्या त्या अज्ञात अधिकाऱ्याने पत्र पाठवलं आहे, त्या अधिकाऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसच्या अंरिम अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे खासदार नेते राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तपासांमध्ये या पत्रातील २६ प्रकरणांचा समावेश करावा, ही विंनती करणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले. समीर वानखेडे यांच्याकडून वसूली झाली आहे. मालदीव आणि मुंबईमध्ये वसूली झाली आहे. माझ्या अंदाजानुसार एक हजार कोटींपेक्षा जास्त वसूली झाली असून एनसीबीच्या तपासात सर्व सत्य समोर येईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

 

First Published on: October 26, 2021 5:12 PM
Exit mobile version