NCB वर बोलतोय तेव्हापासून धमकीचे फोन; नवाब मलिकांना वाय प्लस सुरक्षा

NCB वर बोलतोय तेव्हापासून धमकीचे फोन; नवाब मलिकांना वाय प्लस सुरक्षा

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने केलेली कारवाई बोगस असल्याचं सांगत अनेक मोठे गौप्यस्फोट करणारे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची सुरुक्षा आता वाढवण्यात आली आहे. नवाब मलिक यांना आता वाय प्लस सुरक्षा दिली जाणार आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत एनसीबीवर जेव्हापासून बोलतोय, तेव्हापासून मला धमकीचे फोन येत आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.

सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत. कशासाठी सुरक्षा वाढवली याची माहिती नाही. पण सुरक्षा वाढवील हे खरं आहे. तसंच हे देखील खरं आहे की, जेव्हापासून पत्रकार परिषद घेतली तेव्हापासून देशभरातून कार्यालयात फोन येत आहेत, उडवून टाकू, इथे मारु, तिथे मारु…अशा धमक्या येत आहेत. हे कोण लोक आहेत याची लेखी तक्रार आम्ही गृह विभागाच्या सचिवांना देणार आहोत. जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असं नवाब मलिकयांनी सांगितलं.

नवाब मलिक यांना व्हाय प्लस

नवाब मलिक यांना आता वाय प्लस सुरक्षा दिली जाणार आहे. चार बंदुकधारी जवान, पायलट कार अशा पद्धतीची सुरक्षा असणार आहे. तसंच, मलिक यांच्या घरीही चार जवान तैनात असणार असल्याची माहिती मिळते. याआधी नवाब मलिकांच्या सुरक्षेत केवळ एक जवान होता.

 

First Published on: October 14, 2021 12:07 PM
Exit mobile version