नवाब मलिकांच्या जावयाची सुटका; संबंधितांना हवी होती खंडणीत लँडक्रुझर?

नवाब मलिकांच्या जावयाची सुटका; संबंधितांना हवी होती खंडणीत लँडक्रुझर?

Nawab Malik informed 7 thousand 713 unemployed get Job in January

मुंबई – कार्डेलिया क्रुझवरील रेव्ह पार्टीत अमली पदार्थ बाळगल्याच्या कारणास्तव अटक करण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खान याचा पुत्र आर्यन याच्या सुटकेसाठी १८ कोटींची खंडणीची मागणी करण्यात आल्याच्या कारणास्तव अडचणीत आलेल्या नार्कोटिक ब्यूरो कंट्रोलच्या संबंधितांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या जावई समीर खान यांच्या सुटकेसाठी मध्यस्थीने लॅण्ड क्रुझर या आलिशान विदेशी वाहनाची मागणी केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लॅण्ड क्रुझर या विदेशी चार चाकी आलिशान गाडीची किंमत आजही सुमारे 45 लाखांहून अधिक आहे. ही मागणी करणार कोण असा प्रश्न आता विचारला जातो आहे.

शाहरुख खानपुत्र आर्यन याला नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे अधिकारी असल्याचे दर्शवत फरार आरोपी किरण गोसावी आणि भाजपचा कल्याण विभाग उपाध्यक्ष मनीष भानुशाली यांना पकडून एनसीबीच्या कार्यालयात नेले होते. या प्रकरणात शाहरुख खान याच्याकडून १८ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोप होताच एकच खळबळ उडाली होती. प्रभाकर साईल या पहिल्या क्रमांकाच्या पंचाने प्रतिज्ञापत्रावर जाहीर केल्याने नार्कोटिक सेलचे अधिकारी चांगलेच संकटात सापडले.

नार्कोटिक सेलमध्ये बाहेरील एजन्सीच्या माध्यमातून धाडी टाकून कमाई करण्याचा गोरख धंदा सुरू असल्याचा आरोप होत असतानाच अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले राज्याचे अल्पसंख्याकमंत्रीनवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या सुटकेसाठी संबंधितांनी लँडक्रुझर गाडी खंडणी म्हणून मागितली होती, अशी माहिती पुढे येऊ लागली आहे. समीर खान यांना करण सजलानी या ब्रिटिश इसमास २० हजार रुपये गुगल पेद्वारे पाठवल्याच्या कारणास्तव १२ जानेवारी २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर सुमारे सहा महिने खान तुरुंगात होते. याकाळात खान यांच्या सुटकेसाठी मधल्या दलालाने खान यांच्या संबंधितांकडे लँडक्रुझर या आलिशान गाडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, मागणी अव्वाच्या सव्वा असल्याने आणि कारवाई सूडबुद्धीने केल्याचे लक्षात घेताच मागणी अव्हेरण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

First Published on: November 1, 2021 12:45 AM
Exit mobile version