न्यायप्रविष्ठ प्रकरणावर बोलणं योग्य नाही, समीर वानखेडेंची मलिकांच्या आरोपावर प्रतिक्रिया

न्यायप्रविष्ठ प्रकरणावर बोलणं योग्य नाही, समीर वानखेडेंची मलिकांच्या आरोपावर प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहे. मलिकांचा जावई समीर खान याला बनावट केसमध्ये अटक करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. समीर खानला एनडीपीएस कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. यावरुन मलिकांनी एनसीबी अधिकरी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. वानखेडेंनी मलिकांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिकांना जे काही करायचे आहे ती त्यांची इच्छा आहे. असे समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी यापुर्वीही आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंच्या कारवाईवर आरोप केला आहे. आर्यन खानला बनावट केसमध्ये अटक करण्यात आले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन जावई समीर खानच्या अटक प्रकरणावरुन समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला आहे. समीर वानखेडे यांनी खोट्या माहितीच्या आधारे आणि खोट्या प्रकरणात जावई समीर खानला अटक केली. वानखेडे यांनी खोट्या बातम्याही माध्यमांना दिल्या आहेत. यामध्ये त्यांच्या नंबरवरुन सर्व माध्यमांना समीर खानकडे २०० किलो गांजा सापडल्याचे सांगितले असल्याचे नवाब मलिकांनी आरोप केला आहे. तसेच समीर खानकडेंनी हर्बल तांबाखू होता त्याला गांजा दाखवण्यात आले आहे. एनसीबीला गांजा आणि हर्बल तंबाखूमधला फरक कळतो की नाही असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर नवाब मलिक यांनी आरोप केला आहे. वानखेडेंनी मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांना जे काही करायचे आहे ती त्यांची इच्छा, प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली आहे.

जावयाच्या सुनावणीस हजर राहण्यास टाळाटाळ

जावई समीर खान याच्या सुनावणीस स्पेशल कोर्टात हजर राहण्यास एनसीबीचे अधिकारी पांडे यांनी सलग ६ महिने टाळाटाळ केली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांनी म्हटलं आहे की, २७ ए मध्ये समीर खान ड्रग पॅडलर असून त्याला अटक करण्यात आली. कोठडी झाली जामीन याचिका केली याचिका रिजेक्ट झाली हायकोर्टमध्ये ६ महिना पुर्ण होणार होते तेव्हा एनसीबीने सांगितले की, आम्ही चार्जशीट दाखल करणार आहोत. हायकोर्टाने सांगितले लोअर कोर्टात जा मग लोअर कोर्टात याचिका करण्यात आली ३ महिन्यांपासून एनसीबीने टाळाटाळ केली. पांडेंनी सांगितले आज मला वेळ नाही त्या सुनावणीला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु जमानत झाली. आणि १२ तारखेला जमानात झाल्यावर न्यायाधीशांनी सही केली. त्यानंतर ऑर्डर काढण्यात आली. त्यामध्ये दावा करण्यात आला होता की २०० किलो गांजा आहे परंतु तो मिळालाच नाही. साडे सात ग्राम जे मिळाला आहे ते गांजा आहे. बाकी सर्व हर्बल टॉबेको असल्याचे अहवालात सांगितले आहे. असं नवाब मलिक यांनी सांगितले.


हेही वाचा : जावयाच्या कार्यालयातील हर्बल तंबाखूला गांजा दाखवण्यात आले, मलिकांचा NCBवर आरोप


 

First Published on: October 14, 2021 12:54 PM
Exit mobile version