‘आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 10 नेत्यांची चौकशी, सध्याच्या शासनाकडून सत्तेचा गैरवापर’; पवारांचा सरकारवर हल्लाबोल

‘आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 10 नेत्यांची चौकशी, सध्याच्या शासनाकडून सत्तेचा गैरवापर’; पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar

‘सध्याच्या शासनाकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 10 बड्या नेत्यांची चौकशी केली. त्यापैकी काही नेत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. IL & FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवत आहे. (NCP Chief Sharad Pawar Slams Shinde Fadnvis Government vvp96)

“सध्याच्या शासनाकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 10 बड्या नेत्यांची चौकशी किंवा काही नाकाही कामासाठी चौकशीसाठी बोलण्यात आले होते. त्यामधील काही लोकांवर कारवाई करण्यात आली आहे”, असे शरद पवार म्हणाले.

“अनिल देशमुख यांना जवळपास 13 ते 14 महिने तुरुंगात ठेवलं. त्यांच्यावर एका शैक्षणिक संस्थेसाठी 100 कोटी रुपये घेतले, असा आरोप करण्यात आला होता. सतत चौकशीनंतर आरोप पत्र जे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये 100 कोटींची रक्कम ही 20 कोटी रुपयांवर आली. याचा अर्थ ते अतिरंजीत अशा प्रकारचे आरोप केले जातात. लोकांच्या समोर सुरूवातीला 100 कोटींचे आरोप गेले. त्यामुळे लोकांना धक्का बसला होता. त्यांची बदनामी करण्याचे काम त्यांनी केली”, असे शरद पवार म्हणाले.

“अनिल देशमुख यांनी शैक्षणिक संस्थेसाठी घेतलेली रक्कम अजूनही त्या शैक्षणिक संस्थेच्या खात्यात आजही आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना 13 ते 14 महिने तुरुंगवास म्हणजेच सध्याचे शासन हे सत्तेचा कसा गैरवापर करत आहे. याचे हे उत्तम उदाहरण आहे”, असेही शरद पवार म्हणाले.


हेही वाचा – समृद्धीच्या ८० किमी रस्त्याचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन; शिर्डी ते घोटीपर्यंतचा मार्ग होणार खुला

First Published on: May 22, 2023 7:15 PM
Exit mobile version