‘विठ्ठलाच्या, माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही’

‘विठ्ठलाच्या, माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी एक पत्रक जारी करून शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला होता. त्यामुळे त्यांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलण्यात येऊ नये, असं पत्रकात जारी केलं होत. याच आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, विठ्ठलाच्या, माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. तसं कुणाला वाटत असेल आणि कुणी परवानगी देत नसेल. तर त्याला वारकरी संप्रदायाच्या विचार समजलाच नसेल. अशी भूमिका कधी सच्चा वारकरी घेणार नाही. त्यामुळे याकडे फारस लक्ष देण्याची गरज नसल्याचे म्हणतं शरद पवारांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला लगावला आहे. आळंदीत जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार बोलत होते.

वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी जारी केलेल्या पत्रकात असं लिहिलं होत की, हिंदू धर्माला शरद पवार हे विरोध करतात. ते रामायणाला देखील विरोध करतात. याशिवाय ते नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना बोलवण्यात येऊ नये. त्यामुळे आज शरद पवारांनी यावर भाष्य केलं.

अशा लहान सहान गोष्टी होत असतात. त्याच्याकडे मी फारस लक्ष देत नाही. याकडे दुर्लक्ष करायचे असते. जो रस्ता आपल्याला पसंत आहे त्या रस्त्यावर प्रामाणिकपणाने जायचं असतं. तिथे बांधिलकी ठेवायची. त्यामध्ये तडजोड करायची नसते. मी याच भावनेने आज या ठिकाणी आलो आहे. मी इथे मनामध्ये कुठला हेतू ठेऊन आलो नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा – शिवसेनेला मोठा धक्का; सेनेचे बडे नेते मनसेत प्रवेश करणार


 

First Published on: February 8, 2020 4:06 PM
Exit mobile version