स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा, मारहाण झाल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप

स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा, मारहाण झाल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप

NCP has alleged that workers were beaten during the BJP program.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडले. त्यावेळी स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा राडा पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरु होताच घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भाजपला कार्यक्रम काहीकाळ थांबवावा लागला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घोषणाबाजी नंतर भाजपच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

दुपारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर संध्याकाळी स्मृती इराणी बालगंधर्व रंगमंदिरात दाखल झाल्या. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदिश मुळिक यांच्यासह अनेक नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बालगंधर्व रंगमंदिरातून बाहेर नेले. मात्र, त्यात वेळी एका भाजप कार्यकर्त्यांने त्यांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला .

स्मृती इराणींच्या उपस्थितीत अमित शाहांच्या पुस्तकाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात झाले. त्यासाठी स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आहेत. अशावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन केले. तर त्याच परिसरातून भाजपचे कार्यकर्तेही मोदी मोदीच्या घोषणा देत बालगंधर्व रंगमंदिराकडे चालत गेले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.

First Published on: May 16, 2022 9:23 PM
Exit mobile version