प्रफुल्ल पटेल यांना ‘ईडी’ची नोटीस

प्रफुल्ल पटेल यांना ‘ईडी’ची नोटीस

प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी उड्डाम मंत्री प्रफुल्ल पटेल यांना शनिवारी सक्तवसुल संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधान आले आहे. या नोटीस नंतर विरोधकांचे धाने दणाणले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी ६ जूनला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवाई क्षेत्रातील एका महत्त्वाच्या करारासंदर्भात दीपक तलवारचा सहभाग असलेल्या व्यवहाराबाबत प्रफुलल्ल पटेल यांनी नोटीस बजावण्यात आली आहे.

तर प्रचारसभेत मोदींचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता निशाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिहार जेलमधील एका व्यक्तीमुळे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची झोप उडाल्याचे म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले नव्हते. मात्र, त्यांचा रोख प्रफुल्ल पटेल यांच्यावरच होता हे सिद्ध झाले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

प्रफुल्ल पटेल केंद्रिय नागरी उड्डाण मंत्री असताना दीपक तलवार हा त्यांच्या संपर्कात होता. त्याने परदेशी हवाई कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी मध्यस्थीचे काम केले होते. याशिवाय ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी’साठी राखून ठेवण्यात आलेले ९० कोटी रुपये हडप केल्याचा त्याच्यावर आरोप होता. दरम्यान यामुळे एअर इंडिया कंपनीला मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी दीपक तलवारला दुबईत अटक करण्यात आले होते. त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. सध्या याप्रकरणाचा तपास ईडी करत आहे.

First Published on: June 1, 2019 4:26 PM
Exit mobile version