सुप्रिया सुळे यांनी केले तारिक अन्वरना रिप्लेस

सुप्रिया सुळे यांनी केले तारिक अन्वरना रिप्लेस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेत पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी संसदीय गटनेतेपदी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. याआधी तारिक अन्वर यांच्याकडे ही जबाबदारी होती. मात्र त्यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे हे पद रीक्त झाले होते.

सुप्रिया सुळे लोकसभेवर दोनदा निर्वाचित झालेल्या आहेत. बारामती या लोकसभा मतदारसंघाचे त्या प्रतिनिधीत्व करतात. उत्कृष्ट संसदपटू हा सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे. तसेच महाराष्ट्रातून सर्वात जास्त प्रश्न विचारण्यामध्येही त्या आघाडीवर असतात. यामुळे त्या नव्या जबाबदारीला उत्तम न्याय देतील, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे राज्य विधीमंडळाचे पक्षनेते आहेत. त्यानंतर आता सुप्रिया सुळे संसदेच्या गटनेत्या झाल्या आहेत. दोघेही दोन्ही सभागृहात सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवण्याचे काम करतील. त्यामुळे ‘दादा राज्यात आणि ताई केंद्रात’ हा कार्यकर्त्यांनी केलेला युक्तीवाद प्रत्यक्षात आल्याचे दिसते.

First Published on: December 12, 2018 1:19 PM
Exit mobile version