निवडणुकांच्या तोंडावर रामाची आठवण येते- शरद पवार

निवडणुकांच्या तोंडावर रामाची आठवण येते- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

देशात साडेचार वर्षे भाजपाचे सरकार आहे. इतके दिवस काय केले, असा प्रश्न उपस्थित करत निवडणुका आल्या की यांना राम मंदिराची आठवण येते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला तसेच आज ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांनीच आता अन्याय सुरु केला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं.

निर्धार विजयाचा मेळाव्यात केले वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एकदिवसीय ‘निर्धार विजयाचा, लक्ष २०१९’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाची विचारधारा देशाच्या ऐक्याला घातक ठरणारी असून हिंदू आणि मुस्लिम समाजात अंतर निर्माण करण्याचे काम सध्या केले जात आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्यावरून वाद घालण्याचे प्रकार केले जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी भाजपावर केली. या सर्व घडामोडींमुळे देशात वेगळे वातावरण निर्माण झाला आहे. या विरोधात सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दुष्काळ ग्रस्तांना मदतीची गरज

दुष्काळातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्याचे काम आम्ही केले. मात्र हे सरकार त्याचा विचार करत नाही. दुष्काळामुळे शेतकरी होरपळत असताना, यावर सरकार काही पावले उचलताना दिसत नाही. यातून या सरकारची मानसिकता लक्षात येते. एकीकडे मुख्यमंत्री आरक्षण देतात. तर दुसरीकडे त्याच पक्षाचे प्रमुख तेलंगणात सांगतात की ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हे वेडेपणा आहे, ते टिकणार नाही असे सांगतात. आता यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

First Published on: December 9, 2018 8:02 PM
Exit mobile version