उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार; ट्विटरवरून केली अधिकृत घोषणा

उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार; ट्विटरवरून केली अधिकृत घोषणा

उदयनराजे भोसले

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकृतपणे भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आपण उद्या, १४ सप्टेंबर रोजी भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले आहे. दिल्लीमध्ये हा पक्ष प्रवेशांचा कार्यक्रमा होणार आहे. यामुळे उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाला आहे.

काय केले आहे ट्विट

पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, ‘आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील’, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, काल, गुरुवारी शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली होती. उदयनराजे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात जवळपास दोन तास बैठक सुरु होती. या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे देखील उपस्थित होते.

First Published on: September 13, 2019 3:37 PM
Exit mobile version