नवीन नाशिक : बुधवारपासून व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद

नवीन नाशिक : बुधवारपासून व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नाशिक परिसरातील किराणा दुकानांसह सर्व अत्यावश्यक श्रेणीतील व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार ते रविवार ५ दिवसांचा बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. निर्णयाला नवीन नाशिक व्यापारी असोसिएशन, सराफ असोसिएशन, कापड व्यापारी संघटना, स्टेशनरी असोसिएशन यांच्यासह सर्व व्यावसायिकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
नाशिक शहर, ना. रोड, पंचवटीपाठोपाठ नवीन नाशिकमधील व्यावसायिकांनी कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बंद पाळण्यासाठी कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे अंबड चे वपोनी कुमार चौधरी यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार सीमा हिरे, अंबडचे व. पो. नि. कुमार चौधरी, नगरसेवक  सुधाकर बडगुजर, राजेंद्र महाले, डी. जी. सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे, दिलीप दातीर,
तानाजी जायभावे, जगन पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब गीते, शिवाजी बरके, राकेश ढोमसे, गोविंद घुगे, दिलीप देवांग, रवी पाटील, सुमनताई सोनवणे, नाना सोमवंशी, विजय पाटील यांच्यासह मोठया संख्येने व्यावसायिक व सर्व राजकिय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे आयोजन योगेश गांगुर्डे, भूषण राणे यांनी केले होते.

भाजीबाजार संदर्भात चर्चा करून निर्णय

बंदमध्ये नवीन नाशिक, अंबड, इंदिरानगर, पाथर्डी फाटा, कामटवाडे परिसरातील दुकाने
बुधवार दि. २४ ते रविवार दि. २८ पर्यंत किराणा दुकांनासह सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दवाखाने, औषधांची दुकाने व दुध विक्री बंदमधून वगळण्यात आली आहेत. तर भाजीबाजार बंद ठेवण्याबाबत भाजीबाजार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
First Published on: June 22, 2020 11:11 PM
Exit mobile version