रत्नागिरीच्या मत्स्यव्यवसाय आयुक्तांना निलेश राणेंची समज

रत्नागिरीच्या मत्स्यव्यवसाय आयुक्तांना निलेश राणेंची समज

कायद्यात जेवढे बसते तेवढच करा, आमदारांच्या सांगण्यावरून झाडाझडती झाली तर मच्छीमारांच्या मागे मी उभा आहे. मच्छीमार हा कुणी स्मगलर नव्हे. पोटापाण्यासाठीच हा व्यवसाय करतात. त्यांच्या अंगावर गेलात तर स्वाभिमान पक्ष सहन करणार नाही, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांना दिला. मच्छीमारांनी स्वाभिमान सरचिटणीस राणे यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या. त्या सभेनंतर तेथील काही उपस्थित मच्छीमारांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून आमदार उदय सामंत यांच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याची माहिती निलेश यांना समजली. त्यामुळे संतप्त झालेल्या राणे यांनी आज सकाळी असंख्य कार्यकर्त्यांसह मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. आमदाराच्या सांगण्यावरून गोरगरीब मच्छीमारांवर कारवाई झाली तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे सांगत राणे यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांना समज दिली.

काय म्हणाले राणे

“मी येथे एलईडीचे समर्थन करायला आलेलो नाही. जे कायद्यात आहे तेच करा. आ. सामंत यांच्या सांगण्यावरुन कारवाई करत असाल, तर ते खपवून घेणार नाही. मच्छीमारांना लक्ष्य केले गेले, तर आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ, असे राणे यांनी बजावले.”- निलेश राणे

First Published on: December 20, 2018 9:55 PM
Exit mobile version