सरकार पडण्याच्या वेळीच मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात?, नितेश राणेंचा पलटवार

सरकार पडण्याच्या वेळीच मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात?, नितेश राणेंचा पलटवार

nitesh rane

सिंधुदुर्गः प्रश्न आम्हीही विचारू शकतो, जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो. अधिवेशनावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच महाविकास आघाडीतील नेत्यांना कोरोना कसा होतो? कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणं, किती योग्य आहे? हे तपासणं गरजेचं आहे. राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, यावरही विचार व्हावा, असा घणाघातही नितेश राणेंनी केलाय. नितेश राणेंनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

माझ्या आजारपणावरही शंका उपस्थित करण्यात आली. मला आजही त्रास होतोय, कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी इथल्या रुग्णालयात दाखल होणार आहे. मनका, पाठीचा त्रास, शुगर लो होतेय, त्याचा इलाज करणार आहे, पण जे बोलले हा राजकीय आजार आहे, पण आरोग्य व्यवस्थेने ज्या ज्या टेस्ट केल्या, त्या काही खोट्या होत्या का? आताच माझं बीपी चेक केलं, ते 152 आहे, ते काय खोटं असेल काय? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का? असे अनेक सवाल राणेंनी यावेळी उपस्थित केले, असंही नितेश राणे म्हणालेत.

सर्वात प्रथम मी न्याय व्यवस्थेचे आभार मानतो. त्यांनी जो निर्णय दिला, त्याचमुळे आजचा दिवस आम्हाला अनुभवायला भेटतोय. पहिल्या दिवसापासून म्हणजे 18 डिसेंबरला ही घटना झाली. मी पहिल्या दिवसापासून पोलिसांना, संबंधित अधिकाऱ्यांना जी जी माहिती हवी होती, सगळ्या तपासकार्यात मी सातत्यानं मदत करत होतो. तशीच मदत त्यांना केली आहे. मी कुठल्याही तपासकार्यात अडथळे आणले नाही, कुठलीही माहिती लपवली नाही. मला जी जी नोटीस मिळालेली, जे जे प्रश्न विचारलेले ती सगळी माहिती माझ्याकडे होती ती देत होतो. याहीपुढे मी देणार आहे. मी विधिमंडळाचा एक सदस्य आहे. दोन वेळा निवडून आलेला एक लोकप्रतिनिधी आहे. जबाबदारीनं वागणं हे माझ्याकडून अपेक्षित असते. माझ्याकडे जे कोणी सहकार्य मागत होते, तेव्हा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सहकार्य करत होतो. पळण्याचा कुठलाही विषय कधी आला नाही. मला पोलिसांनी अटक करण्याची पण गरज भासली नाही. ज्या दिवशी मी शरण आलो, तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाचं मला चार दिवस संरक्षण होतं, त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय.


हेही वाचाः Nitesh Rane : नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल, रुग्णालयातून डिस्चार्ज

First Published on: February 10, 2022 4:17 PM
Exit mobile version