गोळ्या झाडण्याचे आदेश मॉरिशसमधून नाही तर मातोश्रीवरून, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार

गोळ्या झाडण्याचे आदेश मॉरिशसमधून नाही तर मातोश्रीवरून, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार

रत्नागिरीतील बारसू येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला तेथील ग्रामस्थ विरोध करत आहेत. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. येथील ग्रामस्थांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसमध्ये बसून बारसूतील आंदोलकांवर हल्ला करण्याचे आदेश दिले, असा आरोप संजय राऊतांनी पत्रकार परिषदेतून केला. दरम्यान, यालाच प्रत्यूत्तर म्हणून भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश मॉरिशसमधून नाही तर मातोश्रीवरून देण्यात आल्याचे नितेश राणे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसमधून लाठीचार्ज आणि गोळ्या झाडण्याचे आदेश दिले असं राऊत म्हणतात. मग संजय राऊत तिथे कपडे धुवायला गेले होते का?, त्यांना माहितीये कुठून आदेश आलेत? हे आदेश मॉरिशसमधून न येता कलानगर आणि मातोश्रीवरून आले आहेत, असा पलटवार नितेश राणेंनी राऊतांवर केला.

तुमच्या मालकाचा मोबाईल तपासून घ्या. विनायक राऊतांना किती मेसेज आणि फोन केले. कोणाच्या फोनवरून केले?, जरा सीडीआर चेक करा. देवेंद्र फडणवीस यांना मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी बोलावलं आहे आणि यांचे मालक मुख्यमंत्री असताना साधं यांना भिवंडीलाही कुणी बोलवतं नव्हतं, असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.


हेही वाचा : उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य यांनी CM होण्याचा डाव रचला, नितेश राणेंचा गंभीर आरोप


 

First Published on: April 29, 2023 11:39 AM
Exit mobile version