Nitesh Rane : नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली, न्यायालयाचा दिलासा मात्र कायम

Nitesh Rane : नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली, न्यायालयाचा दिलासा मात्र कायम

Nitesh Rane : नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली, न्यायालयाचा दिलासा मात्र कायम

भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यावर नितेश राणेंचे वकिल संग्राम देसाई यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयामध्ये दोन वेळा सुनावणी करण्यात आली आहे. आज पुन्हा सुनावणी होती. नितेश राणेंच्या वकिलांची बाजू न्यायालयाने ऐकूण घेतली आहे. पंरतु वेळेची मर्यादा संपल्यामुळे कोर्टाकडून सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सिंधुदुर्गात शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये नितेश राणे सहभागी होते असा आरोप करण्यात येत आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार नितेश राणे यांना राजकीय कारणास्तव चुकीच्या पद्धतीने कशाप्रकारे गोवण्यात आले आहे. त्याची उदाहरणे देण्यात आली आहेत. एकंदरपणे एफआयर दाखल करण्यामध्ये जो उशीर झाला होता. त्या कालखंडात शिवसेनेचे जे राजकीय नेते फिर्यादींना भेटले आणि फिर्यादींचा सत्कार झाला ते सगळं न्यायालयाला दाखवण्यात आले आहे. मनीष दळवी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. कोर्टाचा वेळ संपत आल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या पुन्हा १ वाजता यावर सुनावणी होणार आहे.

मनीष दळवींना अटकेपासून संरक्षण

मनीष दळवींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी वेळ लागणार होता. गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मनीष दळवी जर आले तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. दळवींना कोणतेही संरक्षण देण्यात आले नव्हते. त्यामुळे न्यायालयाकडे विनंती करण्यात आले होते की, मनीष दळवींना मतदानाला जाण्यासाठी संरक्षण देण्यात यावे. ज्या प्रकारे नितेश राणेंचा अटक करण्यात येणार नाही असे सरकारी वकिलांनी सांगितले आहे. तसेच मनीष दळवींच्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे मनीष दळवी यांना गुरुवारी मतदानाचा अधिकार बजावता येणार असल्याचे संग्राम देसाई यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : संजय राऊत कोणाचे प्रवक्ते माहितीय, आपली उंची किती, पंतप्रधानांची किती?, फडणवीसांचा पलटवार

First Published on: January 12, 2022 3:39 PM
Exit mobile version